उस्मानाबाद :नवरात्रीपूर्वी श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस शनिवारपासून प्रारंभ (Shri Tuljabhavani MataManchaki Nidra begin) झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मंचकी निद्रेसाठी पलंग तयार केला. आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपवून २६ सप्टेंबरला पहाटे श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान (Mata will enthroned in Osmanabad) होईल.
Shri Tuljabhavani Mata : श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ - नवरात्रोत्सव 2022
नवरात्रीपूर्वी श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस शनिवारपासून प्रारंभ (Shri Tuljabhavani Mata Manchaki Nidra begin) झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मंचकी निद्रेसाठी पलंग तयार केला. आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपवून २६ सप्टेंबरला पहाटे श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान (Mata will enthroned in Osmanabad) होईल.
कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला :शनिवारी सकाळी देवीजींच्या गादीचा कापूस पिंजण्यासाठी परिसरातील आराधी महिलांनी गर्दी केली होती. आराधी गीताच्या तालावर महिलांनी कापूस पिंजला. या वेळी मानकरी जनार्दन निकते,शकुंतला निकते व मंगेश निकते यांनी गाद्या शिवून घेतल्या.त्यांना नागेश कुलकर्णी यांनी गाद्या शिवण्यास मदत केली. पलंगावर नवीन नवार पट्ट्या बांधून घेत दुपारनंतर नवीन गाद्या अंथरूण पलंग निद्रेसाठी सज्ज ठेवला (Mata Manchaki Nidra begin) होता. यासाठी बब्रुवान पलंगे, संभाजी पलंगे, संग्राम पलंगे, आदर्श पलंगे, गोपाळ पलंगे, सुनील पलंगे, विनोद पलंगे, अरुण पलंगे, नारायण पलंगे, राजाभाऊ पलंगे, ओम पलंगे, नेताजी पलंगे, कृष्णा पलंगे, कालिदास पलंगे आदींनी परिश्रम घेतले. मातेच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे.शम्मू बाशुमियाँ पिंजारी यांच्याकडे परंपरागत हा मान चालत आलेला आहे. शम्मू पिंजारी यांनी गाद्यांचा कापूस पिंजला. त्यांना त्यांच्या पत्नीने साहाय्य केले. (Shri Tuljabhavani Mata in Osmanabad)
'आई राजा उदो उदो’च्या जयघोष :सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर, श्री खंडोबाचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावून 'आई राजा उदो उदो’च्या जयघोषात देवीची मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली. तत्पूर्वी गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी उरकण्यात आले. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा उरकण्यात आली. या वेळी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, नागेश शितोळे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी, सेवेकरी - मानकरी उपस्थित होते. (26th September early morning when Mata enthroned)