महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमरग्यात शाॅर्ट-सर्किटमुळे पाच एकर ऊस जळाला, लाखोंचे नुकसान

पाच एकरमध्ये ऊसाचे पीक घेणारे शेतकरी अशोक तुळशीराम इंगळे आणि गोदावरी अशोक इंगळे यांनी आपल्या शेतात ऊसाला अगदी चिटकून असलेल्या विद्युत तारांमधून ठिणग्या पडून संपूर्ण ऊसाने पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण पाच एकर ऊसाचा कोळसा झाला.

उमरगा
पाच एकर ऊस जळून खाक

By

Published : Nov 27, 2019, 7:19 PM IST

उस्मानाबाद- उमरगा शिवारातील सर्वे नंबर 407 मधील शेतकरी अशोक इंगळे यांचा 5 एकर ऊस जळून राख झाला. विद्युत वाहिन्यांतून ठिणग्या पडल्याने ऊस जळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उमरग्यातील जळून खाक झालेल्या ऊसाची दृश्ये


सर्वे नंबर 407, जवळ पास पाच एकर मध्ये ऊसाचे पिक घेणारे शेतकरी अशोक तुळशीराम इंगळे आणि गोदावरी अशोक इंगळे यांनी आपल्या 5 एकर रानात, नोव्हेंबर 2018 मध्ये साडेतीन हजार रुपये टन दराने ऊसाचे बेणे लागवड केली. लागवडी करता पंचवीस हजार रुपये एकर प्रमाणे खर्च झाला पाच एकरात लागवड केली. या दुष्काळातही वर्षभर कष्ट करून ऊस जगवला. काढणीला आलेल्या ऊसाला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. ऊसाला अगदी चिटकून असलेल्या विघुत तारांमधून ठिणग्या पडून संपूर्ण ऊसाने पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण पाच एकर ऊसाचा कोळसा झाला. ही घटना समजतास उमरगा सज्याचे तलाठी एस.एम. काझी आणि कोतवाल गफ्फुर औटी यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details