उस्मानाबाद- जिल्ह्यातील कारी या गावात एका तरुणाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन केले. अमोल जाधव असे त्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे गावातील नेते, पुढारी निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. पॅनल उभा करणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे अशाप्रकारे दिवसागणिक निवडणुकीची चुरस वाढत चालली आहे. राज्य सरकारकडूनही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी विविध बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील कारी या गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी या मागणीसाठी एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले. अमोल जाधव असे त्या तरुणाचे नाव आहे.