महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेमध्ये राहिली ते मावळे गेले ते कावळे, सेनेतील बंडाळीवर सावंतांची खोचक टीका - OMRAJE MIMBALKAR

शिवसेनेमध्ये राहिले ते मावळे, गेले ते कावळे... उस्मानाबाद मतदारसंघातील बंडाळीवर तानाजी सावंताची खोचक प्रतिक्रिया... २३ तारखेनंतर ओमराजेच खासदार असल्याचे सांगत गायकवाडांसह विरोधकावरही साधला निशाणा

तानाजी सावंत - शिवसेना

By

Published : Apr 18, 2019, 1:21 PM IST

उस्मानाबाद- शिवसेनेमध्ये राहिले ते मावळे, गेले ते कावळे अशी प्रतिक्रिया देत सेनेच्या नाराज खासदारांवर आ. तानाजी सावंत यांनी खोचक टीका केली आहे. तसेच या मतदारसंघात शिवसेनाच उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावतांनी आज उस्मानाबादमध्ये मतदान केले, त्यावेळी ते बोलत होते.

तानाजी सावंत - शिवसेना


सावंत म्हणाले, देशात मोदी लाट अजूनही कायम आहे आणि पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येणार आहे. उस्मानाबादमध्ये सध्या सगळीकडे शिवसेनेलाच मतदान मिळत आहे. शिवसैनिक हा कट्टर असतो, त्यामुळे मतदारसंघात काहींनी पक्षाविरोधात केलेली बंडाळी, कार्टून वाद याचा काय उपयोग नाही. कारण उडाले ते कावळे राहिले ते मावळे अशा शब्दात त्यांनी यावेळी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांबदद्ल मत व्यक्त केले आहे.


विद्यामान खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबद्दल विचारणा केली असता, सावतं यांनी गायकवा हे २३ ताऱखेपर्यंतच खासदार असतील आणि त्यानंतर उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी गायकवांडाबदद्ल बोलणे टाळेल. तसेच आगामी काळात उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास करणार असल्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केला. शेतकरी कर्जमुक्त करणे, देशातील मागास जिल्हा असलेली ओळख करून या जिल्ह्यात हरित क्रांती करायचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details