महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेतील एका शिवसेना आमदाराला कोरोनाची लागण; गुरुवारी आढळले 132 बाधित - उस्मानाबाद कोरोना केसेस

लोहारा-उमरगा या मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी 132 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 991 वर पोहोचली.

Shivsena mla corona positive
शिवसेना आमदाराला कोरोना

By

Published : Jul 31, 2020, 3:13 PM IST

Updated : Jul 31, 2020, 5:21 PM IST

उस्मानाबाद - येथील एका शिवसेना आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उमरगा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोरोना विषाणू दिवसेंदिवस जिल्ह्यात आपली पकड मजबूत करत असून गुरुवारी दिवसभरात 132 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. बुधवारी 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती.

शिवसेना आमदाराला कोरोना

कोरोनाबाधित आमदारांची प्रकृती ठिक आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्‍तदाबाचा त्रास असल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्याची डोकेदुखी ठरत असून आत्तापर्यंत 991 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे 482 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत, तर 461 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. 48 रुग्णांनी उपचारा दरम्यान जीव गमावला आहे.

Last Updated : Jul 31, 2020, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details