महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रवींद्र गायकवाड समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, तिकिट नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक - OSMANABAD

रवींद्र गायकवाड समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र गायकवाड यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

रवींद्र गायकवाड समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न,

By

Published : Mar 23, 2019, 4:10 PM IST

Updated : Mar 23, 2019, 5:43 PM IST

उस्मानाबाद - रवींद्र गायकवाड समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळीच सेनेच्या कार्यकर्त्यांनी समर्थकाला रोखल्याने अनर्थ टळला. रवींद्र गायकवाड यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.


विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट नाकारले आहे. त्यांच्या जागी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रवींद्र गायकवाड यांनांच येथून उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

रवींद्र गायकवाड समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न,

अपक्ष लढण्याची मागणी

रवींद्र गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढावी अशी त्यांच्या कार्यकत्यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात गायकवाड समर्थकांची उमरगा येथे बैठक सुरू असून थोड्याच वेळात निर्णय होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांचे तिकीट कापल्यामुळे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी २ हजारच्या वर कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Mar 23, 2019, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details