उस्मानाबाद- विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती टिकणार की तुटणार, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. युती झाल्यास, अनेक मतदारसंघांत बंडखोरी व नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर जागावाटपावरून चर्चा होत असल्या, तरी भाजपला युती नको आहे की काय? असे चित्र दिसत आहे.
हेही वाचा - संभाजी ब्रिगेडही विधानसभेच्या रिंगणात; लढवणार 100 जागा
'आमच ठरलय' असे दोन्ही पक्ष म्हणत असले, तरी युतीची गरज फक्त शिवसेनालाच आहे, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. उस्मानाबादमधील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी भाजप महायुतीचा झेंडा विधानभवनावर फडकवण्यासाठी आशीर्वाद मागितला. मात्र, यामध्ये शिवसेनेचा उल्लेख आढळून आला नाही. 2014 साली विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांना सोबत घेऊन महायुती केली होती. त्यामध्ये शिवसेना नव्हती. त्यामुळे यावेळेसही महायुतीमध्ये शिवसेना असणार की नाही? हा प्रश्न कायम आहे.