महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओमप्रकाशराजे निंबाळकर आघाडीवर, शिवसेनेने साजरा केला आनंदोत्सव - omprakash nimbalkar

उस्मानाबादमध्ये शिवसेना उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव.

शिवसेनेने साजरा केला आनंदोत्सव

By

Published : May 23, 2019, 5:03 PM IST

Updated : May 23, 2019, 5:13 PM IST


उस्मानाबाद- लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे ओमप्रकाशराजे निंबाळकर हे आघाडीवर होते. सध्या मतमोजणीची सतरावी फेरी सुरू असून ९८ हजार मतांनी शिवसेनेचे उमेदवार पुढे आहेत.ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध त्यांचे बंधू राणा जगजितसिंह पाटील अशी ही लढत आहे.

शिवसेनेने साजरा केला आनंदोत्सव

ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे सोळाव्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्यामुळे शिवसेनेने एकमेकांना पेढे खाऊ घालून आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शंकरराव बोरकर, प्रतापसिंह पाटील, भाजपचे नितीन काळे, दत्ता कुलकर्णी हे उपस्थित होते.

Last Updated : May 23, 2019, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details