उस्मानाबाद- शहरात प्रजासत्ताक दिनापासून 2 ठिकाणी गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या या थाळीला मूर्त स्वरूप येणार असून, शहरात दररोज 250 थाळी विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील उपहारगृह व मध्यवर्ती बस स्थानकातील उपहारगृहात ही शिवभोजन थाळी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने 10 रुपयात जेवण मिळेल, असे वचन दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणूनही या शिवभोजन थाळीकडे पाहिले जात आहे.