उस्मानाबाद -राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश शरद पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही आज विकास करण्यासाठी भाजपमध्ये जात आहोत. इतके दिवस सर्व काही तुमच्या हातात होते, मग तुम्ही इतके दिवस काय केले, असे म्हणत पवार यांनी हावभाव करत राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली.
शरद पवार यांच्या टीकेनंतर निष्ठावंत राहिलेल्या पाटील व पवार कुटुंबातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आज (मंगळवार) प्रथमच शरद पवार यांनी जिल्ह्यात येऊन कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रूपाली चाकणकर यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते नेतेमंडळी उपस्थित होती.
हेही वाचा - तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला