महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा,  शरद पवारांचा तोल सुटला - sharad pawar fuuny statement

डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर पवारांनी प्रथम राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेता सदर वक्तव्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

By

Published : Sep 17, 2019, 9:44 PM IST

Updated : Sep 17, 2019, 10:33 PM IST

उस्मानाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (मंगळवार) चांगलेच बरसले. त्यांच्यावर टीका करत असताना पवारांचा तोल सुटला व तुम्हाला कुठे जायचेय तिथे जावा आणि झक मारा, अशी टीका पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली आहे.

उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

शरद पवारांनी आज उस्मानाबाद येते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी पवार म्हणाले, मी एका नेत्याला भेटलो असता त्यांनी कारखान्याच्या चौकशीच्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे साहेब मला जाण्याशिवाय पर्याय नाही, असे तो नेता मला म्हणाला. मी त्याला तुम्ही कुठेही जावा कुठेही झक मारा, असे बोललो. पवारांनी 'झक मारा' हे वाक्य वापरतना कोणाचाही नामोल्लेख केला नाही. त्यामुळे हा शब्द डॉ. पद्मसिंह पाटील, उदयनराजे किंवा राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांपैकी कोणाला वापराला हा चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा - 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'

डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर पवारांनी प्रथम राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेतला व भव्य शक्ती प्रदर्शन करत राणाजगजितसिंह पाटील व डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर थेट तोफ डागली. पुढील काळात पाटील व पवार कुटुंबाची लढाई अधिकच तीव्र होईल, असे संकेत दिसून येत आहेत.

हेही वाचा - नाणार पुन्हा पेटणार; मुख्यमंत्र्यांचे प्रकल्पावरून मोठे विधान...

Last Updated : Sep 17, 2019, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details