उस्मानाबाद -तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवला सुरवात झाली आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिरात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की सहन करावी लागत आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही भाविक पायी चालत तुळजापूरला येतात. मात्र, एवढा प्रवास करून येथे आल्यानंतर खासगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की करून भाविकांना मंदिराच्या बाहेर ढकलले जाते.