उस्मानाबाद - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिवसेनापुढे सरसावली आहे. शुक्रवारी याच सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रा. डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्यावतीने महिला सक्षमीकरण रोजगार व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ईट येथे करण्यात आले.
उस्मानाबादेत सावंत प्रतिष्ठानच्या वतीने 100 शिलाई मशीनचे वाटप
पहिल्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी या तीन तालुक्यात 1 हजार शिलाई मशीन सावंत प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात भूम-परंडा-वाशी या तीन तालुक्यात 1 हजार शिलाई मशीन सावंत प्रतिष्ठानच्यावतीने महिलांना देण्यात येणार आहेत. शुक्रवारी 100 मशीनचे वाटप महिलांना करण्यात आले. या महिलांना शिवणकाम शिकवले जाणार आहे. ज्या महिलांना शिवनकाम येत नाही, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या महिलांना यातून शिवण्यात येणाऱ्या कापडातून रोजगार दिला जाणार आहे.
आपण सुरू केलेले काम हे प्राथमिक स्वरूपाचे असून महिला खऱ्या अर्थाने कशा सक्षम होतील व हा उपक्रम पुढे सक्षम करण्यासाठी महिलांबरोबर लागेल ते कष्ट करण्याची तयारी असल्याचे मत सवांत यांनी बोलून दाखवली.