उस्मानाबाद- शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उस्मानाबाद शहरात सलग 24 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मागील 24 दिवसांपासून प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी चक्क तिरडी व जनाजा उठाव आंदोलन करून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला.
उस्मानाबादमध्ये 'सीएए'च्या निषेधार्थ 'तिरडी व जनाजा उठाव' आंदोलन - उस्मानाबाद जिल्हा बातमी
सीएएच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या तिरडी व जनाजा उठाव आंदोलनात उस्मानाबाद शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सीएएच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या तिरडी व जनाजा उठाव आंदोलनात उस्मानाबाद शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात 2 दिवसापूर्वी कफन ओढून सरकारचा निषेध करण्यात आला होता.
सीएए कायद्याची तिरडी व जनाजा उठवून त्यांचे अंतिम संस्कार करा, या कायद्याचे दफन करा. आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो आहे. त्यामुळे असंवैधानिक पद्धतीने सीएए आणि एनआरसी लागू करू नका, असे आव्हान यावेळी आंदोलकांनी सरकारला दिले.