महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परांड्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; तहसीलदाराच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर

वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात केळकर गंभीर जखमी झाले आहेत.

वाळू माफिया
वाळू माफिया

By

Published : Dec 14, 2019, 9:19 AM IST

Updated : Dec 14, 2019, 10:50 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परांडा तालुक्यातील सीना प्रकल्पात हा प्रकार घडला.

तहसीलदारांच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर


शनिवारी पहाटे ही घटना घडली. तहसीलदार अनिल हेळकर यांना उपचारासाठी बार्शी येथील मामासाहेब जगदाळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीना प्रकल्पात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसील विभागाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार अनिल हेळकर हे कारवाई करण्यासाठी गेले.


कारवाई दरम्यान तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर घालण्यात आला. यात केळकर गंभीर जखमी झाले आहेत. अंगावरून ट्रॅक्‍टर गेल्याने त्यांचा कंबरेचा भाग मोडला असल्याची माहिती मिळाली आहे.


या घटनेमुळे वाळू माफियांची दादागिरी पुन्हा समोर आली आहे. आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी वाळू माफियांची वाहने ताब्यात घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Last Updated : Dec 14, 2019, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details