उस्मानाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील केस कर्तनालयाचे ( सलून ) दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच दिवसांमध्ये सलून व्यवसायिकांनी आपापली सलूनची दुकाने स्वच्छ करायची आहेत.
कोरोना इफेक्ट; स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सलूनचे दुकानेही राहणार बंद - osmanabad corona news
20 ते 24 मार्चपर्यंत सलून, दाढी कटींग दुकाने बंद असणार असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, 20 ते 24 मार्चपर्यंत सलून, दाढी कटींग दुकाने बंद असणार असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असून यासंबंधी नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सलून दुकाने बंद करत असल्याच्या निर्णयाचे निवेदन पत्र दिले. नाभिक समाज संघटनेने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत स्वतःहून पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे. यावेळी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, दत्तात्रय भालेकर, दाजी पवार, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी बैठकीत हा निर्णय घेतला.