जालना- 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने संत गोरा कुंभार यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या वस्तुंचा देखावा या ठिकाणी मांडण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने संत गोरा कुंभार यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या वस्तुंचा देखावा या ठिकाणी मांडण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा
ग्रामीण भागात संत गोरोबाकाका यांनी भारतातले पहिले मराठी साहित्य संमेलन भरवल्याचे अभ्यासक सांगतात. उस्मानाबादमधील तेरी येथे हे संमेलन झाले होते. त्यामुळे संत गोरोबाकाका यांच्या जीवनावर आधारीत ग्रामीण भागातील देखावा या ठिकाणी करण्यात आला आहे.
संत गोरा कुंभार यांचे घर त्याचसोबत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत.