उस्मानाबाद - मागील भांडणाची कुरापत काढून मंगरूळ शिवारातील एका वस्तीवरील दोन मोठे जमाव देवधानोरा शिवारात आले आणि तिथे झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला. काल (रविवारी) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा जमाव एकत्र आला होता. शेती आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून या जमावाने देवधानोरा येथील एका समाजातील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
उस्मानाबादमध्ये दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत बाप-लेकाचा मृत्यू - दोन गटात हाणामारी उस्मानाबाद
काल (रविवारी) संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा जमाव एकत्र आला होता. शेती आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून या जमावाने देवधानोरा येथील एका समाजातील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी काठ्या, कुऱ्हाड आणि दगडाचा वापर करण्यात आला. यात संतोष पवार या 18 वर्षीय तरुणाचा आणि शिवाजी बिचवा पवार या दोघा बाप-लेकाचा जागीच मृत्य झाला. तर यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व अन्य एक अशा तिघांना गंभीर मार लागला. त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, येरमळा, शिराढोण येथील सहायक पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली. मृत झालेल्या दोघांना येथील उपजिल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.