महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 17, 2020, 12:31 PM IST

Updated : May 17, 2020, 3:38 PM IST

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर महसूल विभागाची कारवाई

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आठवड्यातील ६ दिवस नियम व अटींचे पालन करुन दिवसातील ६ तास दुकाने उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे, असे असतानाही अनेक दुकानदार दुकानात गर्दी जमवित असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने शहरातील सहा दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली.

उस्मानाबादमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर महसूल विभागाची कारवाई
उस्मानाबादमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर महसूल विभागाची कारवाई

उस्मानाबाद- ऑरेंज झोन असलेल्या जिल्ह्यातील व्यवसायिकांना दुकानांमध्ये शारीरिक अंतर पाळणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यातील काही व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा विक्रेत्यांविरुध्द महसूल विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ व्यवसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

उस्मानाबादमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या दुकानांवर महसूल विभागाची कारवाई

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आठवड्यातील ६ दिवस नियम व अटींचे पालन करुन दिवसातील ६ तास दुकाने उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. असे असतानाही अनेक दुकानदार दुकानात गर्दी जमवित असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने शहरातील सहा दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील अनेक विक्रेत्यांनी कारवाईचा धसका घेतला आहे. हे विक्रेते दुकानात येणाऱ्या ग्राहकांना शिस्त लावताना दिसत आहेत. तर काही दुकानदार नियमांकडे दुर्लक्ष करीत दुकानामध्ये गर्दी जमवित होते.

महसूल विभागाच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांची पाहणी केली असता, २ हॉटेल चालकांनी हॉटेलमध्ये गर्दी जमविल्याचे आढळून आले. तर कापड व इतर ६ दुकानदारांनी दुकानामध्ये गर्दी जमल्याचे आढळून आले. याप्रकरणी हॉटेल चालकाकडून प्रत्येकी १ हजार रुपये व इतर दुकानदारांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Last Updated : May 17, 2020, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details