उस्मानाबाद :जागतिक खो खो स्पर्धा घेण्याबाबत महाराष्ट्र खो खो असोसिएशनची चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले. ५५व्या पुरुष महिला राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या ( Men Women National Kho Kho Tournament ) उद्घाटन प्रसंगी भारतीय खो खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांनी ३२ देश सहभागी होणाऱ्या जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची विनंती ( Request to hold World Championship in Maharashtra ) केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवार बोलत होते.
World Kho Kho Tournament : जागतिक खो खो स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची विनंती; महाराष्ट्र खो खो असोसिएशनशी चर्चा करून घेणार निर्णय - discussed with Maharashtra Kho Kho Association
जागतिक खो खो स्पर्धा ( World Kho Kho Tournament ) घेण्याबाबत महाराष्ट्र खो खो असोसिएशनची ( Discussion of Maharashtra Kho Kho Association ) चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition leader of Maharashtra Ajit Pawar ) यांनी दिले.
चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न : या स्पर्धेत देशभरातून पुरुषाचे 36 महिलांचे 34 असे 70 संघ सहभागी झाले आहेत. याच स्पर्धेतून देशाचा खोखोचा संघ निवडला जाणार आहे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, उस्मानाबाद खो-खो असोसिएशनने चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही त्रुटी राहीली तर आयोजकांच्या निदर्शनास आणून द्या, त्या दूर केल्या जातील.
खो-खोपटूंना शिवछत्रपती पुरस्कार : स्पर्धेच्या चांगल्या आठवणी तुम्ही आपापल्या राज्यात घेऊन जाल, असा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेटबरोबर अन्य सांघीक खेळाडूंनी चांगली चमकदार कामगिरी दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी सातव्यांदा विजेतेपद पटकावले. त्या स्पर्धेत युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. उस्मानाबाद जिल्ह्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. जिल्ह्यातील खो-खोपटूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असल्याचा उल्लेख अजित पवार यांनी यावेळी केला. यावेळी माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील माजी आमदार मधुकर चव्हाण, महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, महेश गादेकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव गोविंद शर्मा आदी उपस्थित होते.