महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध धंदे बंद करा, रिपब्लिकन सेनेचे कळंब पोलीस ठाण्यासमोर आंदोलन - उस्मानाबाद जिल्हा बातमी

अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने खुले दुकान मांडून आंदोलन करण्यात येत आहे.

Republican sena agitation
रिपब्लिकन सेनेचे कळंब पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

By

Published : Feb 18, 2020, 7:57 PM IST

उस्मानाबाद- रिपब्लिकन सेनेच्यावतीने अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी अवैध धंद्याचे खुले दुकान मांडून जाहीर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. कळंब पोलीस ठाण्यासमोरच हे आंदोलन करण्यात येत आहे.

रिपब्लिकन सेनेचे कळंब पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

हेही वाचा -सामूदायिक विवाह सोहळ्यात आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे लग्न

वाळू, मटका, जुगार, गुटखा व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने व निवेदने देण्यात आली. मात्र, या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता अवैध धंद्याच्या विरोधात संवैधानिक मार्गाने प्रतिकात्मक खुले अवैध दुकान टाकून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनस्थळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूचा ट्रक, जुगाराचे साहित्य ठेऊन केलेले हे आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

तर हे अवैध धंदे बंद न केल्यास पोलीस अधिकाऱ्यांना शहरात चालणाऱ्या मटक्याच्या चिठ्यांचा आहेर करू, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांनी दिला आहे.

हेही वाचा -हा विषय गंभीर..! बोलताना चुका होतातच, इंदोरीकर महाराजांचा उद्देशही पाहावा

ABOUT THE AUTHOR

...view details