उस्मानाबाद -चिखली येथील त्या पोलिसांच्या कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे उस्मानाबादकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सोलापूर येथे ड्युटी करून सुट्टीसाठी जिल्ह्यातील चिखली येथे 2 दिवस राहिलेल्या पोलिसाला सोलापूर येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ग्रीन झोन असलेला उस्मानाबाद ऑरेंजमध्ये जातो की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
त्या' पोलिसाच्या कुटुंबातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह - उस्मानाबादमध्ये कोरोना
चिखली येथील त्या पोलिसांच्या कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे उस्मानाबादकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
![त्या' पोलिसाच्या कुटुंबातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह](https://etvbharatimages.akamaized.net/breaking/breaking_1200.png)
Breaking News
कोरोनाग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांचे व त्याच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेतल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती हाती आली आहे. हे अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.