उस्मानाबाद- राज्यात राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पक्षात घेतले आहेत. आता तर थेट शरद पवार यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनाच पक्षात घेऊन मोठा धक्का देण्याचे ठरवले आहे. पाटील प्रवेशामुळे केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला नाहीतर संपूर्ण राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.
राणा जगजितसिंह पाटलांचा परिसंवाद मेळावा भाजप प्रवेशाबाबत चर्चा होणार...? - शरद पवार
शरद पवार यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनाच पक्षात घेऊन मोठा धक्का देण्याचे ठरवले आहे. पाटील प्रवेशामुळे केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला नाहीतर संपूर्ण राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.
पवारांचे अत्यंत विश्वासू व जवळचे नातेवाईक म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख आहे. पवारांनी आजपर्यंत राजकारण केले. त्या चांगल्या वाईट गोष्टीत नेहमीच सोबत राहणारा व्यक्ती म्हणजे डॉ. पाटील. पण, आता हेच पाटील कुटुंबीय पवारांची साथ सोडणार असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. भाजपमध्ये प्रवेश राणा जगजितसिंह पाटील यांनी आज कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व पवारांशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते देखील संतप्त भावना व्यक्त करत आहेत. यापूर्वी भाजपने पवार यांचे नातेवाईक व राणा जगजितसिंह पाटील यांची चुलत बहीण कांचन कुल यांना पक्ष प्रवेश देत थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा उमेदवारी देऊन तगडी लढत दिली होती. आता तर पद्मसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजप काय रणनिती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.