महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद पंचायत समितीवर राणा पाटील यांचेच वर्चस्व - उस्मानाबाद पंचायत समिती निवडूक बातमी

सभापतिपदी भाजपच्या हेमा चांदणी तर उपसभापतिपदी आमदार समर्थक संजय लोखंडे यांची निवड झाली. आमदार पाटील राष्ट्रवादीमध्ये असताना राष्ट्रवादीच्या चिन्हावर 16 सदस्य निवडून आले. शिवसेनेचे 3 सदस्य, काँग्रेसचे 2 सदस्य तर भाजपचे 3 सदस्य निवडून आले होते.

rana-patil-dominated-on-osmanabad-panchayat-samiti
पंचायत समितीवर राणा पाटील यांचेच वर्चस्व

By

Published : Jan 1, 2020, 8:38 AM IST

उस्मानाबाद - राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादीत असल्यापासून उस्मानाबाद पंचायत समितीवर पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. पंचायत समितीच्या सभापती निवडीत पुन्हा एकदा आमदार पाटील यांचे वर्चस्व कायम पाहायला मिळाले. आमदार पाटील यांच्या गटाचा एक सदस्य तटस्थ राहिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पंचायत समितीवर राणा पाटील यांचेच वर्चस्व

हेही वाचा-'आरे' प्रकरणी वादग्रस्त अधिकारी अश्विनी भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती

सभापतीपदी भाजपच्या हेमा चांदणी तर आमदार समर्थक उपसभापतीपदी संजय लोखंडे यांची निवड झाली. आमदार पाटील राष्ट्रवादीमध्ये असताना राष्ट्रवादीच्या चिन्हावर 16 सदस्य निवडून आले. शिवसेनेचे 3 सदस्य, काँग्रेसचे 2 सदस्य तर भाजपचे 3 सदस्य निवडून आले होते. आमदार पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांचे 16 व भाजपचे मूळचे 3 असे 19 सदस्य पंचायत समितीमध्ये झाले होते. यामुळे त्यांचा सभापती व उपसभापती होणार हे निश्चित मानले गेले होते. दोन्ही गटातील उमेदवारांनी आपापले अर्ज सादर केले होते. प्रत्यक्ष हात दाखवून मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या चांदणे यांना 18 तर कुसूम इंगळे यांना पाच मते मिळाली म्हणजेच एक पंचायत समिती सदस्य तटस्थ राहिला.

ABOUT THE AUTHOR

...view details