उस्मानाबाद - तब्बल दोन महिन्यानंतर एनडीआरफचे केंद्रीय पाहणी पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. यावरुन भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्यशासनाला जबाबदार धरले आहे.
राज्यशासन जबाबदार
उस्मानाबाद - तब्बल दोन महिन्यानंतर एनडीआरफचे केंद्रीय पाहणी पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. यावरुन भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्यशासनाला जबाबदार धरले आहे.
राज्यशासन जबाबदार
केंद्राचे पाहणी पथक दोन महिने उशिरा आल्याने सर्वत्र टीका होत आहे. मात्र मला यात पडायचे नसून राज्यसरकारने उशिरा गोषवारा दिल्यामुळे केंद्रीय पथकाला पाहणी करण्यासाठी राज्यात यायला उशीर झाला असे, पाटील यांनी सांगितले. पाऊस पडल्यानंतर राज्यसरकारने पाहणी करून त्याचा गोषवारा तयार करून केंद्राकडे देणे अपेक्षित होते. केंद्राने तशी गोषवाराची मागणी केली होती. मात्र सरकारने गोषवारा देण्यास उशीर केला त्यामुळेच केंद्रीय पथकाने नुकसान झालेल्या भागाची उशिराने पाहणी करण्यासाठी सुरुवात केल्याचे सांगितले. मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची पाहणी करण्यासाठी हे पथक आज जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील पाटोदा, केशेगाव, लोहारा अशा नुकसानग्रस्त भागाची या पथकाने पाहणी केली. जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीन,उडीद,मूग,तूर, फळबागा असे एकूण 2 लाख 59 हजार 255 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या होत्या.
हेही वाचा -मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल