उस्मानाबाद -तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज भाजपमध्येत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. पाटील यांनी आज 'परिवार संवाद' सभेचे आयोजन केले होते. सभेपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण तयार करण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांच्या टीमने मनसेच्या थीम सॉंगचा आधार घेतला. ''तुमच्या राजाला साथ द्या'' हे गीत संवाद सभेच्या ठिकाणी लावत कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तयार केले. त्यामुळे सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपात आणि प्रचार गीत मनसेचे असा विचीत्र तिहेरी संगम राणा जगजितसिंह पाटील यांच्या सभेत पाहायला मिळाला.
VIDEO : राष्ट्रवादीचा आमदार.. करणार भाजपात प्रवेश अन् प्रचार गीत मनसेचे..! - तुमच्या राजाला साथ द्या
'तुमच्या राजाला साथ द्या' हे गीत संवाद सभेच्या ठिकाणी लावत कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तयार केले. त्यामुळे सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपात आणि प्रचार गीत मनसेचे असा विचीत्र तिहेरी संगम राणाजगजितसिंह पाटील यांच्या सभेत पाहायला मिळाला.
सोडचिठ्ठी राष्ट्रवादीला, प्रवेश भाजपत, प्रचार गीत मनसेचे
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने हे थीम सॉंग लॉंच केले होते. मुंबईतील मनसेसैनिकांच्या मेळाव्यात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे गाणे सादर केले होते