महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाचे चार थेंब पडताच चारा छावण्या झाल्या बंद ...

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात काही ठिकाणी थोडा पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी शेतात पेरणीच्या कामाला सुरूवात करत आहेत. म्हणून ते आपली जनावरे चारा छावण्यांमधून वापस घेऊन जात आहेत.

शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या.

By

Published : Jun 30, 2019, 5:08 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती दरवर्षी वाढताना दिसते. अत्यल्प पावसामुळे जनावरांच्या खाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जिल्ह्यात 105 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आज घडीला 48 चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.

शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात काही ठिकाणी थोडा पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी शेतात पेरणीच्या कामाला सुरुवात करत आहेत. म्हणून ते आपली जनावरे चारा छावण्यांमधून माघारी घेऊन जात आहेत. त्या कारणामुळे चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून एकूण 105 चारा छावण्यांमध्ये जवळपास 7 लाख 37 हजार 347 इतकी लहान मोठे जनावरे आश्रयास होती.

उस्मानाबाद, परंडा तालुक्‍यातील काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतीच्या कामानिमित्त शेतकऱ्यांनी परतीची वाट धरली आहे. यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details