उस्मानाबाद -वारंवार पडणारा दुष्काळ पाणीटंचाई हे जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. मात्र, या वर्षीचे चित्र थोडेसे बदललेले दिसत आहे. आत्तापर्यंत संपूर्ण पावसाळा होत आला तरी पाऊस पडत नव्हता. मात्र, परतीच्या पावसाने जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या १० वर्षात रस्त्यावरून साचलेले पाणी कधी वाहिले नव्हते, धरणंही कोरडी पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र, या परतीच्या पावसामुळे चक्क रस्त्यावर थोडा वेळ तुडुंब वाहणारे पाणी पाहायला मिळाल्याने नागरिक सुखावले आहेत. आजघडीला जिल्ह्यात 91.70 टक्के पाऊस झाला असून अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. या पावसामुळे छोट्या-मोठ्या धरणात पाणी साठवायला मदत होणार आहे.