महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत बरसतोय परतीचा पाऊस - परतीचा पाऊस

उस्मानाबाद, तुळजापूर शहरांसह ग्रामीण भागात संध्याकाळच्या दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात झाली.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 19, 2019, 1:22 PM IST

उस्मानाबाद- उस्मानाबाद, तुळजापूर शहरांसह ग्रामीण भागात संध्याकाळच्या दरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस असे, चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले.

हेही वाचा - ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या टेकाळेला पाच दिवसांची पोलीस कोठडी


सध्या सोयाबीन, उडीद, मूग काढण्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी पीक काढण्याची तयारी केली आहे. मात्र, या येणाऱ्या परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या राशी खोळंबल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या काही भागात या परतीच्या पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर अजूनही जिल्ह्यात म्हणावा तसा मुसळधार पाऊस झाला नाही.

हेही वाचा - ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर - अपक्ष उमेदवार दत्ता तुपे

ABOUT THE AUTHOR

...view details