उस्मानाबाद - उत्तर प्रदेशात राहुल गांधींना करण्यात आलेल्या अटकेचे पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधींच्या अटकेचे पडसाद उस्मानाबादेत, पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन - osmanabad congrss hathras incident prtoest news
उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या दडपशाहीचा निषेध कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांच्याही फोटो यावेळी जाळण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या दडपशाहीचा निषेध कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांच्याही फोटो यावेळी जाळण्यात आले. यावेळी योगी आदीत्यनाथ यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.