उस्मानाबाद- शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्राबाहेर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांचे वाढलेले शुल्क आणि रखडलेले निकाल याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
उस्मानाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ढोल बजाव आंदोलन - late result bamu
आंदोलनात पदवी व पदव्युत्तर विभागाच्या विविध शाखांच्या वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पदवी व पदव्युत्तर विभागाच्या अनेक शाखांचे निकाल अद्याप लागले नसून ते तात्काळ जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
![उस्मानाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ढोल बजाव आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3634604-797-3634604-1561210552045.jpg)
आंदोलनात पदवी व पदव्युत्तर विभागाच्या विविध शाखांच्या वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पदवी व पदव्युत्तर विभागाच्या अनेक शाखांचे निकाल अद्याप लागले नसून ते तात्काळ जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विद्यापीठाच्या कारभाराचा निषेध करत ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये बीएससी आणि बीएच्या सर्वच वर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र, अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्या आणि इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने संचालक अनार साळुंके यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.