उस्मानाबाद- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व संशोधन बिलाचा विरोध करत मुस्लिम समुदायाकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. यावर मतदान होऊन ते बहुमताने संमत झाले. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. मात्र, याचा विरोध करत या बिलाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळण्यात आली.
उस्मानाबाद: घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत - उस्मानाबाद नागरिकत्व संशोधन बिल आंदोलन बातमी
मुस्लीम समुदायातील काहींनी या बिलाचा विरोध केला आहे. काल (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समुदायातील नागरिक जमा झाले. विधेयक विरोधाचे फलक, काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
![उस्मानाबाद: घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत protest-against-citizenship-amendment-bill-in-osmanabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5367815-thumbnail-3x2-osmanabad.jpg)
घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत
घोषणा देत जाळली नागरिकत्व संशोधन बिलाची प्रत
हेही वाचा-राहुल गांधींच्या "त्या" वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
मुस्लीम समुदायातील काहींनी या बिलाचा विरोध केला आहे. काल (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समुदायातील नागरिक जमा झाले. विधेयक विरोधाचे फलक, काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर बिलाची प्रत जाळून त्यांनी विरोध दर्शवला.