उस्मानाबाद- वाचन संस्कृती ही काय प्रबोधन करून वाढवता येणारी बाब नव्हे... ती उपजतच असणे आवश्यक आहे. मुलांवर होणारे संस्कार त्याची जडणघडण ही जर त्या वातावरणात असेल तर आपोआपच वाचनाची गोडी निर्माण होते, असे प्रतिपादन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनातील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
'वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रबोधनाची गरज नाही ते उपजतच असावे लागते' - वाचन संस्कृती
उस्मानाबाद येथील ९३ व्या साहित्य संमेलनाला मिळत असलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. पहिल्या दिवसापेक्षा आज येणाऱ्या साहित्य प्रमिंची संख्या वाढली आहे. शिवाय संमेलनात भरघोस कार्यक्रमही आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एक अनोखीमेजवानी मिळाली आहे. दिवसेंदिवस वाचनाची संख्या वाढत आहे. फक्त ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे, त्या प्रमाणात वाढत नसल्याची खंत ठाले पाटलांनी यावेळी व्यक्त केली
उस्मानाबाद येथील ९३ व्या साहित्य संमेलनाला मिळत असलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. पहिल्या दिवसापेक्षा आज येणाऱ्या साहित्य प्रमिंची संख्या वाढली आहे. शिवाय संमेलनात भरघोस कार्यक्रमही आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एक अनोखीमेजवानी मिळाली आहे. दिवसेंदिवस वाचनाची संख्या वाढत आहे. फक्त ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे, त्या प्रमाणात वाढत नसल्याची खंत ठाले पाटलांनी यावेळी व्यक्त केली. वाचकांना वेगवेगळे माध्यमे उपलब्ध झाली आहेत. पण वाचन माध्यमांची बरोबरी होऊच शकत नाही. त्यामुळे वाचकांची संख्या कमी झाली, असे म्हणणे संयुक्तिक होणार नसल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान 20 नवीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेखकांचा सत्कारही करण्यात आला.