उस्मानाबाद - दुष्काळी परिस्थितीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन घटल्याचे समोर आले आहे. तूर आणि हरभऱ्यांची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरेदी केंद्रे आहेत. पण, या केंद्रांवर आतापर्यंत केवळ २३८ जणांनी विक्रीसाठी नोंद केली आहे.
उस्मानाबादमध्ये तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन घटले; खरेदी केंद्रांवर केवळ २३८ जणांची नोंद - हरभरा
आतापर्यंत गुंजोटीतील केंद्रावरच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली आहे. तुरीचे घटलेले उत्पादन हा दुष्काळाचा परिणाम असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडून ८ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असते. या केंद्रांवर आतापर्यंत २३८ जणांनी नोंदणी केली आहे. यात गुंजोटीतून ५४, वाशी ६१, उस्मानाबाद १, नळदुर्ग २, काळेगाव ७४, भूम २ लोहारातून ४३ जणांनी नोंदी केल्या आहेत.
आतापर्यंत गुंजोटीतील केंद्रावरच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली आहे. तुरीचे घटलेले उत्पादन हा दुष्काळाचा परिणाम असल्याचे अधिकारी सांगत आहेत. गेल्यावर्षी खरेदी केंद्रावर १ लाख ५५ हजार १७२ क्विंटल तूर, तर १ लाख ८७ हजार २६७ क्विंटल खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र उडीद ४ हजार ७५१ क्विंटल, मूग ८ हजार ८६५ क्विंटल एवढीच खरेदी करण्यात आली आहे.