राज्यातील प्राथमिक शिक्षक देणार एक दिवसाचे वेतन
लॉकडाऊन दरम्यान महाविकास आघाडी सरकारला सोईसुविधा पुरवण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
उस्मानाबाद - राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यानंतर जनजीवन आणखी विस्कळीत झाले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच सरकारी उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन देणार असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांनी संबंधित माहिती दिली आहे. यासंबंधी त्यांनी अहवाल सादर केला असून ही रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीला जाणार असल्याचे ते म्हणाले.