उस्मानाबाद- शहरात 10 ते 12 जानेवारी दरम्यान ९३ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी उस्मानाबादकर सज्ज झाले असून तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कवी पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या हस्ते होणार आहे. तर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
उस्मानाबादेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू - 93 marathi sahitya sammelan prepearations
साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. तर, या संमेलन स्थळाला उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर संत गोरोबा काका यांच्या नावावरून संत गोरोबा काका नगरी, असे नाव देण्यात आले आहे.
साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. तर, या संमेलन स्थळाला उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर संत गोरोबा काका यांच्या नावावरून संत गोरोबा काका नगरी, असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मंडप उभारणीची तयारी सुरू झाली आहे. संमेलनात साहित्य रसिकांना पुस्तके खरेदी करता यावे यासाठी भव्य ग्रंथालय उभारणीचे काम देखील सुरू आहे. या साहित्य संमेलनाच्या स्मरणीकेचे काम अंतिम टप्प्यात असून तिला पोत, असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचाच्या उभारणीचा शुभारंभ पार पडला. यावेळी उस्मानाबादचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास घाडगे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा-संतप्त महिलांनी उस्मानाबाद नगरपरिषदेला ठोकले टाळे, कर्मचाऱ्यांना कोंडले!