उस्मानाबाद -केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथून आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व इतर साहित्य प्राप्त करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या सुचनांना अनुसरून उस्मानाबाद जिल्हा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी तिरुचिरापल्ली येथून ईव्हीएम मशीन ताब्यात घेतले.
विधानसभा निवडणूक 2019; उस्मानाबाद जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्सची प्राथमिक तपासणी - उस्मानाबाद जिल्हाधिकारी news
उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशिन व इतर साहित्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या 5 अभियंत्यांनी या सर्व मशिन्सची तपासणी केली. पिंपरीतील शासकीय गोदामांमध्ये पोलिस बंदोबस्तात इतर सर्व ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या तपासणीची सुरुवात झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रथम स्तरीय तपासणीकरिता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी विनंती पत्र पाठवण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपासणीवेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनवर मतदान करून मतदान यंत्राची पडताळणी केली. तपासणी करत असताना अभियंत्यांच्या निर्देशानुसार ज्या मशीन्समध्ये प्राथमिक तपासणी वेळी दोष आढळले, त्या फॉल्टी म्हणून रद्द करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली दिली आहे.