उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आज शहराच्या बोंबले हनुमान रोड भागातील एका महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ही महिला ही 8 महिन्यांची गरोदर असून ती उस्मानाबाद शहरातील 4 रुग्णालयांत उपचारासाठी गेली होती. त्यामुळे आता धोका वाढला असल्याचे बोलले जात आहे.
उस्मानाबाद : गर्भवतीस कोरोनाची लागण, चार रुग्णालयांत गेली होती उपचारांसाठी - कोरोना न्यूज अपडेट्स
उस्मानाबाद शहरातील एका गर्भवतीस कोरोनाची लागण झाल्याचे प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ही महिला गरोदरपणाच्या तपासणीसाठी चार रुग्णालयांत गेली होती, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यांनी सांगितले आहे.
गरोदर महिला कोरोना पॉझिटिव
शहरातील डॉ. मिटकरी यांच्याकडे या महिलेची गरोदरपणाची नियमित तपासणी सुरू होती. महिलेचे वजन जास्त असल्याने व पायाला सूज असल्याने त्यांना लातूर येथे उपचारासाठी पाठविले होते. मात्र, त्यापूर्वी ही महिला डॉ. डंबळ, डॉ. स्वामी व सह्याद्री मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारांसाठी गेली होती, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे यांनी दिली आहे. सध्यास्थितीत ही महिला लातूर येथे उपचार घेत असून तिथे तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.