उस्मानाबाद - चुलीतील आग पेटवण्यासाठी आणि पोटातील आग विजवण्यासाठी गरोदर महिलांवर हातात कोयता घ्यायची वेळ आली आहे. दुष्काळी बाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचे स्थलांतर हे तर बहुचर्चित आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क 45 गरोदर महिलांना ऊस तोडीची कामे करावी लागत आहेत.
उस्मानाबादेत गर्भवती महिलांच्या हातात कोयता, आरोग्य विभागाची मदत - OSMANABAD SUGARCANE WORKERS NEWS
चुलीतील आग पेटवण्यासाठी आणि पोटातील आग विजवण्यासाठी गरोदर महिलांवर हातात कोयता घ्यायची वेळ आली आहे.जिल्ह्यातील जवळपास 45 महिला गरोदर असून या महिला ऊस तोडीचे अवघड आणि ओझे उचलण्याचे काम करत आहेत. एखाद्या वर्षी ऊसतोडणीसाठी जाणे टाळले तर भविष्यातील उदरनिर्वाहचा प्रश्न गंभीर होतो त्यामुळेच ही अडचण ओळखून गरोदर महिलांनी ऊसतोडीचे काम करण्यांचा निर्णय घेतला आहे.
गर्भवती महिलांची अवस्था
बीड जिल्ह्यात ऊस तोडणी कामगारांची संख्या अधिक आहे. इतर जिल्ह्यातही कामगार आणि शेतकऱ्यांवरही हीच परिस्थिती ओढवली आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे नापिक शेतीवर अवंलबून न राहता हे मजूर परिवारासह ऊस तोडणी करण्यासाठी बाहेर पडतात. यात उस्मानाबाद आरोग्य विभागाच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली आहे. बाहेरील जिल्ह्यातील जवळपास 45 महिला गरोदर असून या महिला ऊस तोडीचे अवघड आणि ओझे उचलण्याचे काम करत आहेत. एखाद्या वर्षी ऊसतोडणीसाठी जाणे टाळले तर भविष्यातील उदरनिर्वाहचा प्रश्न गंभीर होतो त्यामुळेच ही अडचण ओळखून गरोदर महिलांनी ऊसतोडीचे काम करण्यांचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाने मोहीम आखली असून जवळपास 210 ऊस तोड कामगारांच्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. यात पाच हजारांपेक्षा अधिक ऊस तोड कामगार काम करत असल्याची नोंद करून घेतली. त्याचबरोबर यातील 45 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून लसीकरण करण्यात आले आहे. संबंधित महिलांना ऊस तोड करण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. मात्र महिला आणि त्यांच्या कुटुंबाकडे पर्याय नसल्याने आरोग्य विभागाकडून आता या महिलांवर खास लक्ष ठेवण्यात येणार आहे. गरोदर महिलांना ज्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्या सर्व ट्रीटमेंट या महिलांना उसाच्या फडावर जाऊन देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगाव यांनी सांगितले.
हेही वाचा -ईडीची नोटीस घेण्यासाठी माझा माणूस भाजप कार्यलयात पाठवलाय - संजय राऊत