महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं' - प्रवीण दरेकरांची नितीन राऊत यांच्यावर टीका

नितीन राऊत यांच्या विधानावर पलटवार करताना दरेकर म्हणाले, की ऊर्जामंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि क्लार्क म्हणून महावितरणमध्ये नोकरी पत्करावी मग आम्ही त्यांना बिलं दाखवायला येऊ. बिलं तपासणं हे काय मंत्र्याचं काम आहे का? असाही प्रश्न दरेकर यांनी विचराला.

pravin darekar
प्रवीण दरेकर

By

Published : Nov 21, 2020, 5:24 PM IST

Updated : Nov 21, 2020, 5:31 PM IST

उस्मानाबाद-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ऊर्जामंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं, त्यानंतर भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिलं दाखवतील, असा खोचक टोला दरेकर यांनी ऊर्जामंत्र्यांना लगावला.

वीजबिला संबंधित मुद्द्यावर बोलताना प्रवीण दरेकर

..तर मी स्वत: वीजबिलाची तपासणी करेन - राऊत

प्रवीण दरेकर हे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जामंत्र्यांवर सडकून टीका केली. ऊर्जामंत्री राऊत यांनी काल भाजपा नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, मी स्वतः विजबिलाची तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपला दिलं होतं.

दरेकरांचा पलटवार -

त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी पलटवार करत मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे. ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती, त्यावरही दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आधी 100 युनिट मोफट देण्याची घोषणा केली, आता म्हणाले सवलतीमध्ये देऊ, हे वीज ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. हे सरकार जुलमी असून, राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण असल्याचा घणाघात दरेकरांनी केला आहे

Last Updated : Nov 21, 2020, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details