महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omraje Nimbalkar: शिवसेना खासदाराचे फेसबुक अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न.. विरोधकांचा हात असल्याचा आरोप - Anand Nagar Police Station

Omraje Nimbalkar Facebook: खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फेसबुक पेज राजकीय विरोधकांनी हॅकरच्या मदतीने हॅक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आनंद नगर पोलीस ठाण्यात दाखल Anand Nagar Police Station करण्यात आली आहे. पेजला मिळत असलेला प्रतिसाद पाहुन राजकीय विरोधकाने हा रडीचा डाव खेळल्याचे खासदार ओमराजे यानी म्हटले आहे.

Omraje Nimbalkar Facebook
Omraje Nimbalkar Facebook

By

Published : Oct 19, 2022, 7:26 PM IST

उस्मानाबाद: खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फेसबुक पेज राजकीय विरोधकांनी हॅकरच्या मदतीने हॅक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आनंद नगर पोलीस ठाण्यात दाखल Anand Nagar Police Station करण्यात आली आहे. पेजला मिळत असलेला प्रतिसाद पाहुन राजकीय विरोधकाने हा रडीचा डाव खेळल्याचे खासदार ओमराजे यानी म्हटले आहे. पेजवरुन प्रसिध्द झालेले महत्वाचे व्हिडिओ डीलीट करण्याचा केविलावाना प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यावर आपण फेसबुकला विनंती करुन, पेज ब्लॉक केल्याची माहिती ही खासदार ओमराजे यानी दिली आहे.

फेसबुकला पेज ब्लॉक करण्याची विनंती ठाकरे सेनेशी प्रामाणिक राहिल्यानंतर झपाट्याने फेसबुक पेजवर खासदारांचे चाहते दुपट्टीने वाढत गेले, शिवाय त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाची अथवा पोस्टची चर्चा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली होती. सगळ्या गोष्टीचा मनात राग धरुन राजकीय विरोधकास मोठी अडचण वाटत असल्याने त्यानी हॅकर्सच्या मदतीने पेजवरील काही व्हिडिओ डिलीट करण्यास सूरुवात केली. ओमराजे यांच्या लक्षात आले की, कोणीतरी पेज हॅक करुन हा प्रकार करत आहेत. तातडीने फेसबुकला पेज ब्लॉक करण्याची विनंती केली. सध्या हे पेज बंद असुन त्यानी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली. ओमराजे यांच्या म्हणण्यानुसार राजकीय विरोधकांचे पेजवरुन काही नोटीफिकेशन आल्याने सर्व प्रकार त्यांच्याच माध्यमातुन झाले आहे.

पत्रकार परिषद त्या पेजवरुन हटविण्यात आलीजनतेचा वाढता प्रतिसाद ही त्यानी दिलेली प्रामाणिक कामाची पावती असते. विरोधकांच्या अशा वागण्याने लोकांच्या मनातील माझी प्रतिमा ते डिलीट कशी करणार, असा प्रश्नही ओमराजे यानी विचारला आहे. याबाबत चौकशीनंतर सत्य सर्वांसमोर येणारच आहे. माझ्याकडे सोशल मिडीयाची कोणतीही वेगळी यंत्रणा नसताना किंवा त्यावर कोणत्याही प्रकारे खर्च न करता वाढलेली लोकप्रियता काहींच्या नजरेत खुपु लागली आहे. मधल्या काळात पत्रकार परिषद घेतली होती. ती पत्रकार परिषद त्या पेजवरुन हटविण्यात आली आहे. त्यानंतर मशालीच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही त्यावरुन हटविला असुन महत्वाचे व्हिडिओ डिलीट होत असल्याचे लवकर लक्षात आले. अन्यथा त्यावरील सर्वच डाटा डिलीट करण्यात आला असता, असा संशयही ओमराजे यानी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details