महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अ. भा. म. सा. संमेलनानंतर उस्मानाबदमध्ये भरवलं जाणार राजकीय साहित्य संमेलन! - political literature festival i

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननंतर आता राजकीय साहित्य संमेलन भरवले जाण्याची शक्यता आहे.

राजकीय साहित्य संमेलनासाठी बैठक पडली पार
राजकीय साहित्य संमेलनासाठी बैठक पडली पार

By

Published : Jan 19, 2020, 2:52 AM IST

उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननंतर आता राजकीय साहित्य संमेलन भरवले जाण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण बनले आहे. दरम्यान, राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर स्थान मिळाले नसल्याने, उस्मानाबादमध्ये आता राजकीय साहित्य संमेलन भरवले जाणार आहे. या संदर्भात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बैठक घेतली. या सर्व पक्षीय बैठकीत राजकीय संमेलन घेण्याला सर्वांनी संमीती दिली आहे.

राजकीय साहित्य संमेलनासाठी बैठक पडली पार

या प्रस्तावीत संमेलनाची धुरा शहराचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्याकडे असणार आहे. हे संमेलन दोन दिवसांचे असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संमेलनासाठी मुख्यमंत्र्यांपासून गावपातळीवरील सरपंच असे सर्वांनाच आमंत्रित केले जाणार असल्याची सांगितले जात आहे. शनिवारी याबाबत बैठक झाली आहे. मात्र, अजूनही संमेलनावर शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र, याची माहिती लवकरच देऊ असे मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -'असे' आहे साईबाबांचे पाथरीतील जन्मस्थळ; जातं, उखळ अन् बरंच काही...

या संमेलनात ग्रंथदिंडीसोबतच इतर कार्यक्रम असतील, संमेलनात राजकारणी त्यांचे अनुभव व्यक्त करत, दुष्काळ, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यासारख्या समस्यांवर चर्चा करतील. या संमेलनात राजकीय नेते त्यांचे साहित्य सादर करतील, 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध मंत्र्यांनी आणि राजकीय नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. मात्र, त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. उस्मानाबादचे खासदार आणि सर्व आमदार, नगराध्यक्ष यांच्याबाबतही हाच प्रकार घडला. कार्यक्रमपत्रिकेवर साधे नावे देखील छापण्यात आले नव्हते. यामुळे राजकीय नेते दुखावले गेले असून त्यातूनच राजकीय साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली गेली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -मेगा भरतीमुळेच भाजपने सरकार घालवले; एकनाथ खडसेंनी पुन्हा डागली तोफ!

ABOUT THE AUTHOR

...view details