महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कायदा सुव्यवस्था गेली खड्‍ड्यात; पोलिसांनी धरला पारंपारिक डॉल्बीच्या तालावर ठेका..! - tuljabhavani temple

नवरात्रौत्सवाच्या काळात दररोज संध्याकाळच्यावेळी देवीचा छबिना निघतो. यानिमित्त वाजत गाजत देवीची मिरवणूक काढली जाते. यावेळी देखील पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना निघाला आणि या छबिन्यात लावण्यात आलेल्या पारंपारिक डॉल्बीच्या तालावरती पोलिसांनी ठेका धरला.

पोलिसांनी धरला डॉल्बीच्या तालावर ठेका

By

Published : Oct 14, 2019, 9:34 PM IST

Updated : Oct 14, 2019, 10:52 PM IST

उस्मानाबाद - नवरात्रौत्सवाच्या काळात तुळजापूर शहरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील लाखो भाविक तुळजापूरच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना अडचणी येऊ नये, गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातील पोलीस नवरात्रौत्सवाच्या काळात तुळजापुरला बोलावले जातात. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवत पोलिसांनी पारंपारिक डॉल्बीच्या (डीजे) तालावर ठेका धरला. त्यामुळे, हे पोलीस तुळजापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आले की ठेका देण्यासाठी आले आहेत? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांनी धरला डॉल्बीच्या तालावर ठेका

राज्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचबरोबर उस्मानाबादमध्येही निवडणूक रंग धरत आहे. यामध्येच तुळजाभवानीचा नवरात्रौत्सवाचा कालावधी असल्याने सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवरात्रौत्सवाच्या काळात दररोज संध्याकाळच्यावेळी देवीचा छबिना निघतो. यानिमित्त वाजत गाजत देवीची मिरवणूक काढली जाते. यावेळी देखील पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना निघाला आणि या छबिन्यात लावण्यात आलेल्या पारंपारिक डॉल्बीच्या तालावरती पोलिसांनी ठेका धरला.

हेही वाचा - काँग्रेसने आमचा जाहीरनामा चोरला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

नवरात्रोत्सवाच्या काळात झाली होती चेंगराचेंगरी

नवरात्रौत्सवाच्या काळात तुळजाभवानीच्या मंदिरात भाविकांची संख्या अधिक असते. ४ वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या काळातच या मंदिरासमोर गर्दी वाढल्याने प्रचंड गोंधळ निर्माण होत चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे, या पोलिसांच्या प्रकारामुळे पुन्हा तुळजापूरमध्ये अशी चेंगराचेंगरी होईल की काय? असा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - महायुतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उस्मानाबादेत

Last Updated : Oct 14, 2019, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details