उस्मानाबाद- विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिला आहेत. पोलीस प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी स्थानिक जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र दलाच्या 4 तुकड्या आणि 1 हजार 47 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 662 शस्त्र परवाना धारकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. तर विशेष मोहिमेतंर्गत 1 गावठी कट्टा आणि 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर 808 लोकांवर बिगर जामिनीचे वॉरंट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.