महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत कत्तलखाना व कत्तलीसाठी जनावरं नेणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त - lcb osmanabad

जिल्ह्यातील कळंब येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जवळपास 30 गायी पकडल्या आहेत. तसेच परंडा येथील अवैध कत्तलखान्यावर छापा मारून सात जिवंत गायींसह 6 मेट्रीक टन गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे.

कत्तलखाना कारवाई

By

Published : Nov 15, 2019, 9:52 AM IST

Updated : Nov 15, 2019, 10:08 AM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यातील कळंब येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जवळपास 30 गायी पकडल्या आहेत. तसेच परंडा येथील अवैध कत्तलखान्यावर छापा मारून सात जिवंत गायींसह 6 मेट्रीक टन गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. कळंब पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत कत्तलीसाठी नेण्यात येणारे तीन टेम्पो पकडले असून 30 गायी, तीन बैल, दोन रेडकू आणि टेम्पो असा जवळपास 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

उस्मानाबादेत कत्तलखाना व कत्तलीसाठी जनावरं नेणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा -माझ्या मुलाचे भविष्य उद्धवस्त होऊ देऊ नका, प्रिन्सच्या वडिलांचे पालिकेला आवाहन

परांडा येथील कत्तलखानावर कारवाई

परांडा ते जुना खानापूर रोडवर लतीफ दगडू कुरेशी यांच्या शेतात चालणाऱया अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB), उस्मानाबादच्या पथकाने पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनानुसार छापा मारला. यावेळी आयशर ट्रकमधून सुमारे 6 मेट्रीक टन गोवंशीय जनावरांचे मांस यासह एकूण 24 लाखांचा माल जप्त करण्यात आला. यावरुन 7 जणांविरुद्ध परांडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Last Updated : Nov 15, 2019, 10:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details