उस्मानाबाद - मेगा इंजिनीअरिंग आर्वीसह रोटरी क्लब ऑफ कुसळंबमध्ये सिटीच्या वतीने कुसळंबमध्ये प्लास्टिक मुक्त भारत मोहिमेंतर्गत रॅली काढण्यात आली होती. यावेळी खामगाव-पंढरपूर मार्गावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
कुसळंबमध्ये प्लास्टिक मुक्त भारत मोहिमेंतर्गत जनजागृती रॅली
प्लास्टिक मुक्त भारत मोहिमेंतर्गत कळंबमध्ये रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यावेळी प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
केंद्र शासनाच्या प्लास्टिक मुक्त भारत अभियानास सुरुवात झाली आहे. शासनामार्फत राष्ट्रीय महामार्गावरील प्लास्टिक उचलण्यात येत आहे. रस्ते विकास प्राधिकरण यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असून काल (21 सप्टेंबर) ला कुसळंबमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी खामगाव-पंढरपूर मार्गावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. या रॅलीत मोहेंकर महाविद्यालयातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. या रॅलीदरम्यान प्लास्टिक वापरण्याचा न वापरण्याचा संदेश देण्यात आला. तसेच ही मोहीम येत्या काळातही राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले