उस्मानाबाद -हात-पाय सक्षम असताना देखील परीक्षा द्यायचे म्हटले की तोंडाला फेस येतो. मात्र, शरीराने अपंग असतानाही त्याने पीएच. डी.च्या प्रवेश परीक्षेत पात्र ठरला. त्याला 'मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महिलांचे योगदान' हा पीएच. डी. चा विषय ठरला. विद्यापीठामध्ये प्रस्ताव सादर केला. मुलाखत देखील झाली. मात्र, तो अंपग असल्याने त्याला गाईडने नाकारले. विजय नाना सरदार, या तरुणाची ही यशोगाथा आहे.
पीएच. डी. प्रवेश परीक्षेत पात्र; मात्र, अपंग असल्याने गाईडने नाकारले विजय २६ वर्षाचा असून त्याची उंची फक्त दीड फूट आहे. त्याने ग्रामीण भागातील धनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण कळंब शहरात झाले. मात्र, अपंग असल्याने त्याने घरीच अभ्यास केला. कधीही कुठला शिकवणी वर्ग लावला नाही. मात्र, तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्यानी संशोधन करायचे ठरवले.
विजयाच्या शिक्षण ग्रामीण भागातील धनेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण कळंब शहरात. अपंग असल्याने शाळेत जाता येत नव्हते. सेल्फ स्टडी करून त्याने आपले हे शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्चशिक्षित झाल्यानंतर विजयला डॉक्टरेट मिळविण्याचे वेध लागले. ''मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील महिलांचे योगदान" या विषयावर त्याने संशोधन करण्याचे ठरविले. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अंत्यत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच. डी. साठी प्रवेश परीक्षा दिली. त्या परीक्षेत तो पात्रही ठरला. त्यानंतर विद्यापीठामध्ये प्रस्तावना सादर केली. त्यानंतर पीएचडीसाठी मुलाखत दिली. अपंग असून त्याने स्वतः माजलगाव, बीड, जालना, उस्मानाबाद येथे जाऊन गाईडची भेट घेतली. मात्र, सर्व सोपस्कार पार पडूनही गाईडनी फक्त अपंगत्वामुळे त्याला नाकारले.
विजयला त्याची आई आणि मित्रांची साथ मिळाली. सर्वजण त्याला लहान मुलाप्रमाणे उचलून प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात. गाईड मिळाला नाही म्हणून विजयने जिद्द सोडली नाही. मात्र, गुणवत्ता असूनही फक्त अपंगत्वामुळे गाईडने डावलले असल्याची खंत आईने व्यक्त केली. मात्र, निदान अपंग दिनाच्या दिवशी तरी एखादा गाईड त्याच्या मदतीला समोर येईल का? हाच प्रश्न आहे. विजयची जिद्द पाहून शरीराने धडधाकट असलेल्या माणसाला हेवा वाटणार, हे मात्र नक्की.