उस्मानाबाद- संपूर्ण जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे आज घडीला जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे काही अटी शिथिल करण्यात आल्या असून दुकाने सुरू झाली आहेत. मात्र दारूची दुकाने आणि बीयर बार उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही.
दारूच्या दुकानांव्यतिरिक्त सर्व दुकाने खुली, मात्र सोशल डिस्टन्सिंग पायदळी... - Peoples not following rule of social distancing in Osmanabad
उस्माबानाद जिल्हा ग्रीनझोनमध्ये आहे. त्यामुळे अटींवर काही दुकाने सुरू झाली आहेत. तथापि, अद्यापही दारुची दुकाने सुरू झालेली नाहीत. मात्र जी दुकाने सुरू झाली आहेत तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच दुकानेही बंद करण्यात आली होती. आज काही नियम व अटी घालून दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली उस्मानाबाद शहरातील असून सध्या कपडे, शूज, मोबाईल, सोने चांदी दुकानासह जवळपास 80 टक्के पेक्षा जास्त दुकाने सुरू झाली आहेत. नागरिकाची अपेक्षेप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली. मास्क सॅनिटायझर व गर्दी न करणे हे नियम कडक असले तरी यापैकी सोशल डिस्टन्सचा नियम पूर्णपणे पायदळी तुडवत असल्याचे दिसते आहे.