महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्य संमेलन : भूमिका मांडायची असल्याचे सांगत, परिसंवाद कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काही व्यक्तींनी गोंधळ घाण्याचा प्रयत्न केला. आपल्याला भूमिका मांडायची असल्याचे सांगत त्यांनी परिसंवाद कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

Marathi Literature Conference
मराठी साहित्य संमेलन

By

Published : Jan 11, 2020, 7:31 PM IST

उस्मानाबाद -साहित्य संमेलनातील मंडप क्रमांक 1 मध्ये परिसंवाद कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी चालु कार्यक्रमात, आम्हाला आमची भूमिका मांडायची आहे, असे सांगत चार ते पाच जणांनी थेट व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला.

भूमिका मांडायची असल्याचे सांगत, परिसंवाद कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न

हेही वाचा... 'वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रबोधनाची गरज नाही ते उपजतच असावे लागते'

जगन्नाथ पाटील असे गृहस्थाचे नाव असून त्यांच्या सोबत इतरही काहीजण होते. परिसंवादाच्या चालू कार्यक्रमात खीळ घालण्याचा प्रयत्न या पाच ते सहा जणांनी केला. त्यामुळे कार्यक्रमात काही काळ अडथळा निर्माण झाला. मात्र, आयोजकांनी त्यांना लगेचच बाहेर काढले. जगन्नाथ पाटील (रा.चाकूर, लातुर) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांसोबत आणखी चार ते पाच लोक असल्याचे समजत आहे.

हेही वाचा... 'गाव करी ते राव न करी', शाळेची इमारत जीर्ण झाली अन् आदिवासींनी बांबू, गवतापासून उभी केलीय अभ्यास कुटी

सुरूवातीपासूनच वाद आणि विरोध यांच्या भोवऱ्यात सापडत असलेले साहित्य संमेलन, त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील असाच प्रकार पहायला मिळाला. परिसंवादाचा कार्यक्रम सुरू असतानाच, आम्हाला आमची भूमिका मांडायची म्हणून जगन्नाथ पाटील यांच्यासह पाच जणांनी व्यासपीठ गाठले. विशेष म्हणजे पाटील यांना संमेलन ठिकाणी 34 नंबरचा स्टॉल देण्यात आलेला आहे. आयोजकांनी, सर्व काही सुरळीत असून काही वेळात आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. मात्र काही काळ गोंधळ झाल्याने पोलीस दाखल झाले होते आणि त्यांनी पुढील चौकशी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details