उस्मानाबाद - जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने गावात कोरोना आजाराबद्दल जनजागृती व मार्गदर्शन करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांचे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. सोबतच, उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करण्यात आले.
कोरोनाशी दोन हात करणाऱ्या प्रशासकीय अधिकार्यांचे स्वागत फुलांच्या पायघड्या घालून स्वागत - अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
कोरोना आजारामध्ये काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढावे व कोरोनासारख्या महामारीमध्ये जे प्रशासकीय अधिकारी स्वतःच्या परिवाराला सोडून आज देशातील नागरिकांची दिवसरात्र सेवा करत आहेत. त्या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने फुलांच्या पायघड्या घालून हे स्वागत केले गेले.
कोरोना आजारामध्ये काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढावे व कोरोनासारख्या महामारीमध्ये जे प्रशासकीय अधिकारी स्वतःच्या परिवाराला सोडून आज देशातील नागरिकांची दिवसरात्र सेवा करत आहेत. त्या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने फुलांच्या पायघड्या घालून हे स्वागत केले गेले. त्याच बरोबर जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने संस्थेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना पत्र लिहून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, बीडीओ, पोलीस प्रशासन, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तलाठी, गामसेवक, शिक्षक, सीमेवरचे जवान व शेतामध्ये काम करणारे शेतकरी यांच्यासह कोरोना आजारामध्ये देशसेवा करणार्या सर्व घटकांचे अभिनंदन करत आभार मानण्यात आले.